कांदाचाळ योजना

कांदाचाळ योजना

या योजनेचा कोण लाभ घेऊ शकतो?

ज्यांच्या शेतामध्ये कांदा लावलेला आहे तसेच ज्यांच्या सातबारावर कांदा या पिकाची नोंद आहे.

या योजनेमध्ये अनुदान किती आहे?

50% अनुदानावर ही योजना काम करते?

ते कसे काय?

या योजनेमध्ये तुम्ही पाच मे टन कांदा साठवणूक पासून ते पंचवीस मे टन कांदा साठवणूक पर्यंत लाभ घेऊ शकता.

आकारमान प्रकल्प खर्च प्रति. चौ. मी.अनुदान
०५ मे. टन३५००० १७५००/-
१० मे. टन७०००० ३५०००/-
१५ मे. टन१०५००० ५२५००/-
२० मे. टन१४०००० ७००००/-
२५ मे. टन१७५००० ८७५००/-

त्याकरिता शासनाने दिलेल्या मापदंडानुसार आपल्याला कांद्याचा बांधावा लागेल. तरच अनुदान आपल्या खात्यामध्ये जमा होईल.

या योजनेकरिता अर्ज कसा करायचा?

तुम्ही दोन बाबी अंतर्गत अर्ज करू शकता

१. राष्ट्रीय कृषी विकास योजना

२. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login

अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्र लागतात?
१. चालू वर्षाचा ७/१२ व ८ अ
२. आधारकार्ड
३. पासबुक ची झेरॉक्स

अधिक माहितीसाठी : खालील माहिती पुस्तिकावर क्लिक करावे.

Leave a Comment