स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
नमस्कार शेतकरी बंधुनो………

आज आपण एका नवीन योजनेची माहिती पाहूया ज्या मध्ये आपला फायदाच फायदा आहे.
फायदा अरे व्हा अशी कोणती योजना आहे.
A. दादा मला फळबाग लागवड करायची आहे पण माझी शेती ५ एकराच्या वर आहे. त्यामुळं मी MGNREGA अंतर्गत फळबाग लागवड साठी अपात्र आहे.
B. मग तुम्ही कृषि विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना मधून फळबाग लागवड करू शकता.
हि योजना अश्याच शेताशेतकऱ्यांसाठी आहे कि जे…….
१. सरकारी नोकरी वर आहे.
२. पेन्शन धारक आहे.
३. INCOME TAX धारक आहे.
४. २ हेक्टर म्हणजे ( ५ एकर ) च्या वर शेती आहे.
तसेच हि योजना १००% राज्य सरकारी अनुदानावर आहे.
C. ती कशी काय ?
खड्डे खोदणे,कलमे/रोपे लागवड, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक द्वारे पाणी इत्यादी १०० % अनुदानावर आहे.
D. मग या योजनेसाठी अर्ज कुठे करू ?
https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
या संकेत स्थळावर जाऊन > अर्ज करा > फलोत्पादन घटक निवडावा.
E. अर्ज करण्या करीत लागणारी कागदपत्रे :
१. ७/१२ व ८ अ
२. आधार कार्ड
३. पासबुक ची झेरॉक्स
F. या योजने मधे १६ बहुवार्षिक फळपिकांचा समावेश आहे.
आंबा,पेरू,चिक्कू,नारळ,सीताफळ, मोसंबी,कागदी लिंबू,संत्रा,आवळा,चिंच,जांभूळ ,फणस इत्यादी

Leave a Comment