नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) 2.0

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा : उद्देश  

हवामान बदलास जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे त्यासाठी आधुनिक तंत्रांचा अवलंब करून संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे

  • शेतीतील उत्पादकता आणि शाश्वतता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे.
  • पाण्याचा कार्यक्षम वापर वाढविण्यासाठी उपाययोजना करणे.
  • जमिनीचे  आरोग्य  सुधारण्यासाठी  संवर्धित शेती पद्धती व इतर उपायांचा अवलंब करणे .
  • शेतीमधून होणारे कर्ब उत्सर्जन कमी करणे आणि जमिनीतील कर्ब ग्रहण वाढविणे .
  • कृषी मालाची मूल्यसाखळी बळकट करणे.
  • हवामान अनुकूल तंत्रज्ञानासाठी विविध संशोधन संस्थांबरोबर भागीदारी करणे .

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा मध्ये समाविष्ट गावे संख्या

अकोला, अमरावती, भंडारा ,बुलढाणा ,चंद्रपूर ,गडचिरोली ,गोंदिया ,नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, बीड, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, हिंगोली ,जालना ,लातूर ,नांदेड, परभणी ,जळगाव ,नाशिक.

वैयक्तिक लाभासाठीचे घटक:-

हे पर्यंत जमीनधारणा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी साठी अनुदान तत्वावर 

जमिनीचे आरोग्य वृद्धी कर्बग्रहण  पुनर्भरण,जलसंचय कार्यक्षम वापर  व्यापारी शेती, कृषिपूरक उद्योग  
वृक्ष लागवड  विहीर पुनर्भरण  शेडनेट, पॉलीहाऊस  
बांबू लागवड  शेततळेबिजोत्पादन  
फळबाग लागवड  शेततळे अस्तरीकरण  रेशीम उद्योग  
जीवाणू खत निर्मिती  नवीन विहीर  मधुमक्षिका पालन   
गांडूळ खत/ नाडेप खत निर्मिती  विद्युत मोटार  गोड्या पाण्यातील मत्स्यपालन  
सेंद्रिय खत निर्मिती  पाईप  शेळीपालन (भूमिहीन कुटुंबे)  
संवर्धित शेती  ठिबक सिंचन, तुषार सिंचन  परसातील कुक्कुटपालन  (भूमिहीन कुटुंबे)  

प्रकल्पांतर्गत सहाय्यित कृषी व्यवसाय

काढणी पश्चात /प्रक्रिया केंद्र

  1. अन्न प्रक्रिया युनिट
  2. एकात्मिक पॅक हाऊस / कृषि उत्पादनाचे संकलन केंद्र
  3. कडधान्य मिल (दाल मिल)
  4. दुध प्रक्रिया युनिट
  5. धान्य प्रक्रिया युनिट (स्वच्छता/ प्रतवारी युनिटसह)
  6. पल्वेरायझर मशीन युनिट
  7. भाजीपाला/ फळ प्रक्रिया केंद्र
  8. मसाले युनिट
  9. हळद प्रक्रिया युनिट
  10. इतर (आटा पॅकिंग युनिट,आले प्रक्रिया युनिट, चिंच प्रक्रिया युनिट,पापड उद्योग, पॅक हाऊस निर्मिती, फळ पिकवणी केंद्र, बटाटा प्रक्रिया युनिट, मका प्रक्रिया केंद्र, शीतगृह, सोया मिल्क प्रोसेसिंग युनिट, स्वयंचलित आटा चक्की)
  • गोदाम साठवणूक केंद्र
  • बीजप्रक्रिया युनिट
  • कांदा चाळ
  • गोदाम व छोटे वेअर हाऊस
  • बियाणे प्रक्रिया उपकरणे
  • बियाणे प्रक्रिया शेड/सुकवणी यार्ड
  • बियाण्यांची साठवण/ गोदाम
  • संपूर्ण बीजप्रक्रिया युनिट (संयंत्रे, गोडाऊन/शेड सह)
  • इतर कृषि व्यवसाय
  • औषधी / सुगंधी वनस्पती प्रक्रिया युनिट
  • कृषी इनपुट सेल (बियाणे, खते आणि कीटकनाशके इ.)
  • गांडूळ खत युनिट
  • जिरॅनिअम तेल प्रक्रिया युनिट
  • तेल गाळप युनिट
  • लिंबोळी अर्क युनिट
  • पशुखाद्य प्रक्रिया युनिट
  • मार्केट आऊटलेट (वातानुकूलित) / कृषी मॉल
  • मुरघास युनिट
  • रेशीम उद्योग
  • रेफ्रिजरेटेड व्हॅन किंवा भाजीपाला/फळे वाहतुकीसाठी वाहन/वाहन
  • वजन काटा
  • शेळी पैदास केंद्र
  • इतर (ऑक्शन शेड,रोपवाटिका शेती, सेंद्रिय कृषी इनपुट, सोलार चरखा युनिट)
  • भाडे तत्वावर कृषी अवजारे सेवा केंद्रांची निर्मिती करणे
  • भाडे तत्वावर कृषी अवजारे सेवा केंद्रांची निर्मिती करणे

1.अर्ज कुठे करावा- 

अर्ज https://dbt.mahapocra.gov.in या वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करावा.

2.ऑनलाईन अर्जा सोबत कोणती कागद पत्रे अपलोड करावीत-

7/12, 8अ, (संवर्ग प्रमाणपत्र- अजा व अज शेतकरी यांचे साठी).

3.अर्जांना मान्यता कोंण देईल-

सरपंच यांचे अध्यक्षतेखालील ग्राम कृषी संजीवनी समिती.

अधिक माहिती साठी मार्गदर्शक सूचना

pocra 2.0 नुसार बदल असू शकतात. 

Other links:

कृषी यांत्रिकीकरण –

https://krishisamridhi.com/wp-admin/post.php?post=26&action=edit

Leave a Comment