नमस्कार शेतकरी बंधुनो,
आज आपण MAHADBT या सरकारी पोर्टल वरील शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना बघूया.

खलील योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ?
ज्या व्यक्तीच्या नावावर सातबारा आहे असे सर्व शेतकरी महाडीबीटी योजनेवरील लाभ घेण्यास पात्र आहेत.
खालील योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
1.सातबारा ,आठ अ
2. आधार कार्ड
3. बँके चे पासबुक
1. कृषि यांत्रिकीकरण योजना –
अनुदान मर्यादा – ट्रॅक्टर – 1 ते 1.25 लाख
इतर औजारे – 40% ते 50% अनुदान
2. राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रती थेंब अधिक पीक मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना
a) ठिबक सिंचन :-
अनुदान अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांनसाठी संच खर्चाच्या
80% व इतर शेतकऱ्यांना 75% संच खर्चाच्या
b) तुषार सिंचन :-
अनुदान अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांनसाठी संच खर्चाच्या
80% व इतर शेतकऱ्यांना 75% संच खर्चाच्या
3. एकात्मिक फलोत्पादन विकास योजना (MIDH)
a) पॅक हाऊस
b) कांदाचाळ
c) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका
d) वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजना
e) सामूहिक शेततळे
f) रायपनिंग चेंबर
g) मल्चिंग
h) शीतगृह
वरील योजनांना जास्तीत जास्त 2 लाख पर्यंत अनुदान अथवा
प्रकल्प खर्चाच्या 50% अनुदान देय आहे.
4. स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
लाभार्थी – महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जे
शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाही त्या सर्व
शेतकऱ्यांकरिता ही योजना लागू.
अनुदान :- 100% अनुदानवर.
वरील सर्व योजने करिता साइटवर स्वतंत्र विंडो दिलेली आहे.
टीप :- सदर योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा.
वरील सर्व योजनेचा लाभ घेण्याकरिता खालील वेबसाईटचा उपयोग करावा